नोकरीसाठी तरुणाचा पुन्हा एल्गार

मुंबई/प्रतिनिधी मराठा आरक्षणाचा मुद्दा पन्हा एकदा ऐरणीवर आलाय. राज्य सरकारच्या निर्णयानंतर हे प्रकरण सध्या कोटीत अडकलय. पण त्या आधी राज्य सरकारने या आरक्षणांतर्गत राज्यातील साडे ३ हजार मराठा तरुणांची विविध शासकीय नोकयांसाठी निवड केली होती. मात्र पात्र असूनही या तरुणांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून सरकारकडून नियुक्तीला स्थगिती देण्यात आलीय असा आरोप तरुणांनी केलाय. याविरोधात मराठा तरुण गेल्या ७ दिवसांपासन आंदोलनाला बसले आहेत. ।